कुडाळातील घरकुल योजनेची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कुडाळ - चर्मकार समाजासाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांकडे भारतीय चर्मकार समाजाने गटविकास अधिकारी यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले. घरकुल योजनेपासून बेघर वंचित होत असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

भारतीय चर्मकार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेतली. श्री. चव्हाण यांनी कुडाळचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 

राज्य अध्यक्ष चव्हाण म्हणाले, ‘‘चर्मकार समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत; २०११ मध्ये चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाल्याने बेघर लोकांच्या नावावर पक्के घर कागदोपत्री दिसत आहे. प्रत्यक्षात बेघर असलेल्या लाभार्थ्यांना बेघर यादीत नाव नसल्याने घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्याची चौकशी व्हावी. चर्मकार समाजाबरोबरच इतर समाजांतील लोकांनासुद्धा शासकीय योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.’’

या वेळी शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत लक्ष वेधण्यात आले. या वेळी राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, प्राजक्त चव्हाण, सचिन चव्हाण, खजिनदार सुरेश चौकेकर, सहचिटणीस रामकृष्ण बांदेकर, प्रतीक्षा चव्हाण, गोमेश चव्हाण, सदस्य गणेश चव्हाण, मालिनी चव्हाण, केशव पिंगुळकर, बापू हुमरमळेकर व सहदेव चव्हाण, विश्‍वनाथ चव्हाण, गणेश पवार, महेश नेरकर, आनंद वालावलकर, रमेश पिंगुळकर, प्रशांत माडकर, गजानन पाताडे, शांताराम चव्हाण, मनोहर वालावलकर आदी उपस्थित होते. 

Web Title: kudal konkan news gharkul scheme inquiry