कोकणची वाहतूक सक्षम करणार - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कुडाळ - कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चौपदरीकरण, चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे आहेत, असे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ओरोस येथे उडान योजनेंतर्गत पासपोर्ट कार्यालय होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (ता. २३) येणार असून त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.

कुडाळ - कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चौपदरीकरण, चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे आहेत, असे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ओरोस येथे उडान योजनेंतर्गत पासपोर्ट कार्यालय होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (ता. २३) येणार असून त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या शेवटच्या कामाचे भूमीपुजन २३ ला सकाळी अकरा वाजता होणार आहे. या अनुषंगाने आज खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, संजय पडते, अभय शिरसाट, अतुल बंगे, सभापती राजन जाधव, जान्हवी सावंत, वर्षा कुडाळकर, राजन नाईक, अनुप नाईक, डॉ. सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू, शरयू घाडी आदी उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, ‘‘कित्येक वर्षे कोकणवासीयांचा प्रलंबित चौपदरीकरणाचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. 

२३ ला या कामाचा भूमीपुजन सोहळा होत आहे. मुख्यमंत्रीू देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, अनंत गीते, रामदास आठवले, रामदास कदम, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, पोटे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती राहणार आहेत. या मार्गावर पाच ब्रीज येणार आहेत. उर्वरीत गडनदी, पियाळी, बेळणा, भंगसाळनदी या ठिकाणी होणारे ब्रीज लवकरच मार्गी लागतील. भूसंपादन अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना एक हजार कोटी मिळणार आहेत. कुडाळ व वागदे येथील पैसे येणे आहे. प्रकल्पग्रस्तांना योग्य भाव देण्यात आला आहे.अजूनही जमिनीबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी, समस्या आहेत. त्यांनी साठ दिवसाच्या आत लवाद म्हणून कार्यरत असणारे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.’’

दीड वर्षात काम झाले पाहिजे असे आदेश गडकरी यांनी ठेकेदारांना दिले आहेत. दर्जेदार काम हे चौपदरीकरणाचे वैशिष्ट्य असणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. चौपदरीकरणालगत वृक्ष लागवड केली जाणार आहे. चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण, चौपदरीकरण यामुळे कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्यासाठी कार्यरत झालो आहोत. चौपदरीकरण कामासाठी जिल्ह्यात दोन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. गडनदी ते झाराप दरम्यानच्या कामाबाबत ठेकेदार हलगर्जीपणा करीत आहेत. त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश राऊत यांनी दिले.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात पासपोर्ट कार्यालये
उडान योजनेंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालये सुरू करावी अशी मागणी श्री. राऊत यांनी परराष्ट्र धोरणमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली. त्यानुसार सहा महिन्यात ओरोस येथे जिल्ह्याचे पासपोर्ट कार्यालय होणार असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. चिपी विमानतळाचे मालवण व कुडाळ जोडरस्ते कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल.

Web Title: kudal konkan news konkan transport do Enabled