कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कुडाळ - न्याय्य मागण्यांसाठी आज नवव्या दिवशीही वीज कंत्राटी कामगारांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवले. विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

कुडाळ - न्याय्य मागण्यांसाठी आज नवव्या दिवशीही वीज कंत्राटी कामगारांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवले. विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

सिंधुदुर्गातच गेली दहा ते बारा वर्षे महावितरणमधील वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. शासन दरबारात त्यांच्या न्याय्य मागण्या अद्यापही प्रलंबीत आहेत. सातत्याने आंदोलन करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आता तर या आंदोलकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा देत राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. २२ मे पासून कामबंद आंदोलन सुरु झाले असून आज हा नववा दिवस आहे. महिला वर्गही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज पाऊस कोसळत असताही आंदोलकांनी कामगार एकजुटीचा विजय अशा घोषणा  देत आंदोलन केले. कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबरोबरच गेल्या चार महिन्याच्या थकीत वेतनासह इतर प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनात महावितरणामध्ये कार्यरत विविध संघटनांबरोबरच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अशोक सावंत, जिल्हा परिषद  उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पाठिंबा दिला.

Web Title: kudal news Contract workers