शिक्षक बडतर्फीसाठी कुणबी बांधवांचा धडक मोर्चा

शिक्षक बडतर्फीसाठी कुणबी बांधवांचा धडक मोर्चा

खेड - तालुक्‍यातील सुकदर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुशीलकुमार पावरा यांना बडतर्फ करण्याची मागणी करीत खेडमधील कुणबी बांधव पंचायत समितीवर धडकले. 

सुकदर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षक पावरा यांना पंचायत समिती प्रशासन पाठीशी घालत असून, हा समाजबांधवांसह त्या पीडित कुटुंबावर अन्याय होत आहे, अशी भावना यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केली. 

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे यांना धारेवर धरीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे तेथील वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले होते. पोलिस निरीक्षक अनिल गंभीर व प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी मध्यस्थी करीत कुणबी बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी शिक्षक पावरा यांना तत्काळ कायमस्वरूपी सेवेतून काढून टाका, अशी मागणी करत पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या केला. श्री. सोनोने यांनी त्या संदर्भात मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतो असे सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर वातावरण निवळले. 

पावरा यांना कायमस्वरूपी सेवेतून कमी केले नाही, तर यापुढे कुणबी समाज मोठे आंदोलन उभारेल याला जबाबदार प्रशासन व प्रशासनाचे अधिकारी असतील, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. यावेळी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील महिलावर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com