विधानपरिषदेसाठी आता कुणबी सेवा संघाने पुढे केले `यांचे` नाव

Kunbi Seva Sangh Recommended Pandurang Upalkar Name For Legislative Council
Kunbi Seva Sangh Recommended Pandurang Upalkar Name For Legislative Council

राजापूर ( रत्नागिरी ) - शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा माजी संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर यांनी सर्वसामान्यांसह तळागाळामध्ये शिवसेना रूजविण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. कोकणामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजाच्या विविध प्रश्‍नांना विविध व्यासपीठावर वाचा फोडली आहे.

भविष्यातही सभागृहामध्ये कुणबी समाजाचे प्रश्‍न मांडून सोडविण्यासाठी कुणबी समाजाचे नेते उपळकर यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

राज्याच्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांची गत महिन्यामध्ये मुदत संपली आहे. या रिक्त झालेल्या जागांसाठी येत्या काही दिवसांमध्ये नियुक्‍त्या होणार आहे. त्यासाठी आपापली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या साऱ्या घडामोडीमध्ये अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाने राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी कुणबी समाज नेत्यांना संधी देण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेकडे केली आहे. याबाबतचे पत्र कुणबी संघाचे सचिव विलास पळसमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांना पाठविले आहे. 

मोठ्या संख्येने असलेल्या कोकणातील कुणबी समाजाने शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणूकांमध्ये साथ दिली आहे. मात्र, कुणबी समाजाचे गेल्या कित्येक वर्षापासून अनेक प्रश्‍न प्रलंबित राहीलेले आहे. विधान परिषदेमध्ये कुणबी समाजाचे प्रश्‍न मांडून सोडविण्यासाठी कुणबी समाज नेत्यांना विधान परिषेदमध्ये संधी मिळावी, अशी मागणी पळसमकर यांनी पत्राद्वारे ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com