कुणकेश्‍वर यात्रेला प्रारंभ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

देवगडमधून २८ गाड्या
देवगड आगारातून कुणकेश्‍वर मार्गावर २८ गाड्या धावणार आहेत. यामध्ये देवगडमधून ८, जामसंडेमधून ३, तर निरोम, किंजवडे, पोयरे, तेलीवाडी, मिठमुंबरी, खारेपाटण, शिरवली, टेंबवली, चाफेड, मोंडतर, तोरसोळे, मोर्वे, तळेबाजार, आयनल, टेंबवली मार्गावरून प्रत्येकी एक गाडी धावणार आहे.

देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, भाविक यात्रेकरूंच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस, प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. यात्रेत विविध व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, खेळाचे साहित्य दाखल झाले आहे. 

रात्री उशिरा मंदिरात विधीवत पूजा होऊन यात्रेला प्रारंभ झाला. सोमवार श्री शिवाचा वार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी होईल, अशी शक्‍यता आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेची बुधवारी (ता. ६) समुद्रस्नानाने सांगता होईल. यात्रेसाठी मंदिर तसेच भक्‍तनिवास परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे.

देवस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे. दर्शन मार्गावर तसेच मंदिराच्या परिसरात मंडप घातला आहे. दर्शन मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यात्राकाळात आरोग्य यंत्रणा कार्यरत असेल. भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिसांनी यंत्रणा कार्यरत केली आहे. उद्या सायंकाळी देवस्वाऱ्या भेटीला येणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन केले आहे. समुद्रकिनारी भेळ, आईस्क्रिम विक्रेते तसेच हॉटेल आदी स्टॉल उभारले आहेत. तेथेही विद्युत रोषणाई केली आहे. बंदोबस्तासाठी पोलिस फौजफाटा कुणकेश्‍वरला दाखल होत होता. 

पोलिस अधिकारी बंदोबस्ताचा आढावा घेत होते. यात्रेसाठी एसटीने हंगामी आगार उभारला आहे. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. तारामुंबरी -मिठमुंबरी पुलावरून कुणकेश्‍वरला येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनेही 
नियोजन केले आहे.

देवगडमधून २८ गाड्या
देवगड आगारातून कुणकेश्‍वर मार्गावर २८ गाड्या धावणार आहेत. यामध्ये देवगडमधून ८, जामसंडेमधून ३, तर निरोम, किंजवडे, पोयरे, तेलीवाडी, मिठमुंबरी, खारेपाटण, शिरवली, टेंबवली, चाफेड, मोंडतर, तोरसोळे, मोर्वे, तळेबाजार, आयनल, टेंबवली मार्गावरून प्रत्येकी एक गाडी धावणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunkeshwar Yatra special