कुवारबावला शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कुवारबावला शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

रत्नागिरी - शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करत सरपंचपदाच्या उमेदवार साधना जांभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता शिवसेनेने जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे.

सेना-भाजपची राज्यात लोकसभेसाठी युतीची झाली आहे. स्थानिक पातळीवर मात्र अजूनही मने जुळलेली दिसत नाही. आमदार उदय सामंत यांनी ही निवडणूक एकत्रित लढण्याबाबत वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात सेनेने स्वबळाची झलक दाखवली आहे. शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी महागठबंधन करून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही परिस्थितीत सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्याचा महागठबंधनाचा प्रयत्न आहे. हे कडवे आव्हान स्वीकारत शिवसेनेने सरपंचपदाचा उमेदवारी अर्ज भरताना आपली ताकद दाखवली. या वेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, माजी सरपंच विनोद झाडगांवकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सरपंचपदासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधून साधना अभिजित जांभेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

सदस्यपदासाठी

प्रभाग 1 मधून सिद्धी बामणे, रंजना विलणकर, नयना देसाई, राजू झगडे, राजू सुर्वे,

प्रभाग 2 ऋतुजा राजेश भाट्ये, वैदेही सनी दुधवडकर, उमेश दत्तात्रय राऊत, योगेश पिलणकर,

प्रभाग 3 जीवन विनायक कोळवणकर, स्नेहल संजय वैशंपायन, अनिल निवृत्ती काटे,

प्रभाग 4 रमेश सावंत, अपर्णा वाडकर, विनोद कृष्णा झाडगांवकर,

प्रभाग 5 चेतन सावंत, रिया तुषार सागवेकर, साक्षी स्वरूप भुते हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com