पारंपारिक सुवर्णा भात बियाणांचा तुटवडा, शेतकरी हवालदिल

सुनील पाटकर
बुधवार, 30 मे 2018

महाड : महाड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी गेले अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या महाबिजच्या सुवर्णा जातीच्या भात बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळत असलेले महाबिजचे बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला खाजगी कंपनीचे महाग बियाणे विकत घ्यावे लागत आहे.महाबिजच्या या कारभाराबाबत शेतकरी संतप्त झाले आहेत.

महाड : महाड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी गेले अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या महाबिजच्या सुवर्णा जातीच्या भात बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळत असलेले महाबिजचे बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला खाजगी कंपनीचे महाग बियाणे विकत घ्यावे लागत आहे.महाबिजच्या या कारभाराबाबत शेतकरी संतप्त झाले आहेत.

कोकणात आता पेरणीची कोमे सुरु झाली आहेत. महा़ड मधील शेतकरी ही पेरणीच्या तयारीला लागले असले तरी पेरणीसाठी परंपरागत वापरल्या जाणाऱ्या महाबिजच्या सुवर्णा जातीच्या बियाणांचा यावर्षी तुटवडा निर्माण झाला असल्याने पेरणीच्या कशी करणार या विवंचनेत शेतकरी पडला आहे. महाड तालुक्यातील एकूण 13 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते, यापेकी बहुतांशी शेती ही पाणथळ जागेतील शेती आहे. तसेच तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी तीन हजार मिमि असल्याने, 140 ते 145 दिवसात तयार गोणा-या  गरवा वाणाचा जास्त वापर तालुक्यात केला जातो.तसेच येथील शेतकरी आपल्या उपयोगासाठी भात पिकवत असतो. त्यामुळे हे शेतकरी महाबिजच्या सुवर्णा या जातीच्या बियाणांचा जास्त वापर करतात.बियाणात बदल करण्याची वृत्ती शेतक-यात दिसत नसल्याने याच वाणावर येथील शेतकरी वर्ष परंपरागत अवलंबून आहे.महाबिजचे सुवर्णा बियाणे मिळत नसल्याने शेतक-यांना खाजगी कंपनीचे महाग बियाणे विकत घ्यावे लागत आहे. विक्रेत्यांकडे या बियाणाचा 900 ते 1 हजार रुपये प्रती 25 किलो या दराने पुरवठा करण्यात येतो.यावर शेतक-याला सवलतही मिळते परंतु  या सर्व विक्रेत्यांनी दुकानाबहेर सुवर्णा बियाणे उपलब्ध नसल्याचा फलक लावल्याने ऐन पेरणी हंगामात शेतकरी कोलमडला आहे.

या वर्षी महाड तालुक्यासाठी कृषी विभागाने महाबिजकडे 700 क्विंटल सुवर्णा बियाणाची मागणी करण्यात आली होती. परंतु महाबिजकडुन केवळ 265.8 क्विंटल एवढाच पुरवढा करण्यात आला आहे.त्यामुळे उर्वरित बियाणांसाठी वाट पाहणे शेतक-याला न परवडारे आहे. तरीही शेती विना पिक राहू नये यासाठी दुपट्ट दराने खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेत आहेत.सरकार आता बियाणांचे ही खाजगीकरण केले जात आहे काय असा सवालही शेतकरी करत आहेत. यावर पर्याय म्हणून काही शेतकरी भातगिरणीतून जुने भात खरेदी करुन त्याचा बियाणा साठी उपयोग करत आहेत. परंतु असे बियाणे हे अशुद्ध असल्याने याचा भातपीकावर परीणाम होत असतो.

या प्रकरणी महाबिजचे रायगड जिल्ह्याचे विक्रेते मनोहर माळी यांच्याशी संपर्क साधला असता कोकण कृषी विद्यापीठाच्या कोकण विकास व संशोधन केंद्रातर्फे जिल्ह्याला एकुण पुरवठ्याच्या केवळ 22 टक्के बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. अपेक्षीत माल आला नसल्याने या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले.

दर तिन वर्षाने शेतातील भातपिकाचे बियाणे बदलले पाहिजे.येथील शेतकरी सुवर्णा या एकाच जातीचा उपयोग वारंवार करत असल्यामुळे या पिकावर करप्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.महाबिजकडे 140 ते 145 दिवस कालावधीच्या अनेक वियाणे उपलब्ध असुन त्याचा उपयोग करावा.
- विष्णू साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी,महाड
 

Web Title: lack of traditional suvarna bhat seeds farmers get upset