सावधान ! आंबोलीत पुन्हा कोसळली दरड

Land Slice In Amboli SIndhudurg Marathi News
Land Slice In Amboli SIndhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला आज सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळली. दरडीची माती थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. याची माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी पोलिस यंत्रेणेसह घटनेची पाहणी केली. 

पोलिसांकडून याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दरडी हटविण्याचे काम केले. मुसळधार पावसामुळे दरडीचा मोठा भाग कमकुवत झाला असून तो खाली येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आवटी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी याबाबतची पाहणी केली.

दरडीचा हा भाग झाडांनी वेढलेला असल्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. घाट मार्गात अन्य काही ठिकाणीही दरडी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली असल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी घाट मार्गाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

तालुक्‍यात गेले ते दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. आजही दरडीचा काही भाग थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला. याबाबत माहिती मिळतात येथील पोलिस निरीक्षक खोत यांच्यासह जिल्हा वाहतूक पोलिस प्रशांत आरोलकर, पोलिस कॉन्स्टेबल बाबू तेली, विलास नर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com