वैभववाडी - भुईबावडा घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प

एकनाथ पवार
शनिवार, 14 जुलै 2018

वैभववाडी : खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात आज (ता.14) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.या मार्गावरील वाहतुक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

शुक्रवारी सकाळपासुन उसंत घेतलेल्या पावसाने सायकांळी उशिरा पुन्हा जोरदार हजेरी लावली.रात्री उशिरापर्यत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाट परिसरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासुन एक किलोमीटर अतंरावर दरड कोसळली. या दरडीने रस्त्याचा बहुतांशी भाग व्यापल्यामुळे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.खारेपाटणकडुन गगनबावड्याकडे काही वाहने घाटात अडकली होती. तर गगनबावड्याकडुन खारेपाटणकडे जाणारी वाहने माघारी आली.या मार्गावरील वाहतुक करूळ घाटमार्गे वळविण्यता आली आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे.दरडीची व्याप्ती मोठी असल्यामुळे मार्ग खुला होण्यास विलंब लागणार आहे.दुपारी दोन वाजेपर्यत वाहतुक पुर्ववत होण्याची शक्यता आहे.

Web Title: landslide at bhuibawda ghat traffic jam