मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली परिसरात आज पहाटे दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली परिसरात आज पहाटे दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबई व गोवा दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी चार तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावर आता संथ गतीने एकेरी वाहतूक सुरु करण्यात आलेली आहे. पावसाने जोर धरल्यावर सकाळने बातमीतून या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. दरड हटवण्याचे काम सुरु केले गेले असले तरी पावसामुळे येथे दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. 

Web Title: Landslide on Mumbai Goa express way