उमेदवारांचा शोध; भाजप बुचकळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

शिवसेनेचेच वर्चस्व; युती तुटल्यास मताधिक्‍य घटेल
लांजा - तालुक्‍यात गेली अनेक वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेची या निवडणुकीत इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवार निवडताना प्रारंभी दमछाक होताना दिसत आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करण्यात अद्यापही यश आलेले नाही. ज्याप्रमाणात शिवसेनेची मोर्चेबांधणी झालेली दिसून येते. त्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीची उमेदवार शोधण्यात ताकद लावण्यात वेळ जात असल्याचे दिसून येते.

लांजा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा गेले कित्येक वर्षे फडकतो आहे. लांजा तालुक्‍यात गावपातळीवर असलेली शिवसेनेची पकड आजही मजबूत आहे. त्यामुळे पाया मजबूत असलेली शिवसेना कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाताना आपल्यातील गट-तट बाजूला ठेवून लढाई जिंकण्याच्या ईर्षेने उतरताना आजही दिसते. सध्या लांजा पंचायत समितीतील सातही गणावर शिवसेनेच एकहाती वर्चस्व आहे, तर जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी तीन गटांवर शिवसेनेचे तर एका गटावर भाजप सत्तेवर आहे.

अजूनपर्यंत तालुक्‍यात शिवसेना-भाजपने एकत्रित येत या ठिकाणी निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यासुद्धा; मात्र यावेळच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे मताधिक्‍य घटण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अजूनपर्यंत निद्रावस्थेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काहीच हालचाल दिसून येत नाही. सध्याच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी एक पुरुष आणि तीन महिला उमेदवार शोधण्याचे काम काँग्रेस वा आघाडीला हाती घ्यावे लागणार आहे. याशिवाय पंचायत समितीच्या आठ गणांपैकी चार गणांसाठी महिला उमेदवार शोधावे लागणार आहेत. शिवसेनेत महिला उमेदवार शोधण्याचे काम सोपे झाले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार आहे. भाजपला स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार शोधमोहीम राबवावी लागणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे कमी कालावधीत ही शोधमोहीम राबवावी लागणार असल्याने येथील भाजप नेतृत्वसुद्धा बुचकळ्यात पडलेले दिसून येते.

तालुक्‍यातील शिवसेनेत उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने कोणत्या कार्यकर्त्याला शांत करायचा हेच प्रश्‍नचिन्ह येथील नेतृत्वाला पडले आहे. दिग्गजांच्या भाऊगर्दीत कोणालाही दुखवणे सध्यातरी शिवसेनेला डोकेदुखी ठरणार आहे; मात्र यासाठी कमिट्यांची आणि कार्यकारिणीची मात्रा लागू पडणार आहे. सर्वच इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले गेल्याने कोणता कार्यकर्ता वरिष्ठांना खूश करून उमेदवारी मिळवतो याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

Web Title: lanja panchyat committee election