उन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका...

अमित गवळे
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होणार असूम, धरण जवळपास रिते झाले आहे. पाठबंधारे विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होणार असूम, धरण जवळपास रिते झाले आहे. पाठबंधारे विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे.

लघू पाठबंधारे विभागामार्फत १९७२ साली उन्हेरे धरणाचे बांधकाम करण्यात आले. बांधकामाचा खर्च १६.९१ लक्ष रुपये झाला. धरणाचे सिंचन क्षेत्र १४२ हेक्टर आहे. मात्र ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती करण्यात आली त्या सिंचनासाठी पाण्याचा वापर होत नाही. मागील अडिच तीन वर्षापुर्वी धरणाची जॅकवेल मोडकळीस आली होती. त्यामुळे धरणातून हळू हळू पाणी वाया जात होते. या संदर्भात त्यावेळी सकाळने लक्ष घालून बातमी दिली होती. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या मॅकॅनिकल विभागाने येथे येवून पाहणी केली असून लवकरच विहिर व गेटची दुरुस्ती करण्यात येणार आहे. असे त्यावेळी कार्यकारी अभियंता, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग कार्यालय कोलाड यांनी सांगितले होते. मात्र आजतागायत यासंदर्भात कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या हि जॅकवेल पुर्णपणे तुटली आहे. हे धरण अखेरची घटका मोजत आहे.

धरण मरणासन्न
* धरणाची जॅकवेल पुर्णपणे तुटली आहे.
* धरणातील पाणी गळती लागून बाहेर वाया जात आहे.
* धरणाच्या बांधांवर झाडी वाढली आहे.
* धरण मद्यपींचा अड्डा बनले आहे.
* धरण गाळाणे भरले आहे.

असा होईल फायदा
धरणाची व कालव्याची दुरुस्ती केल्यास आणि शेतकऱ्यांनी उन्हाळी शेतीसाठी पुढाकार घेतल्यास सभोवतालचा परिसर सिंचनाखाली येऊ शकतो.

* आजुबाजुच्या परिसरातील शेतीला, नद्यांना व विहिरांना मुबलक पाणी मिळेल.
* गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल.

अधिकाधिक लोकांनी सिंचनासाठी पाणी वापरणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठी संपल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी कमी झाले आहे. त्यामुळे धरणाची वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- शिवमुर्ती पवार, पोलीस पाटील, उन्हेरे.

डिजाईन डिव्हिजन कडून डिजाईन भेटले नव्हते त्यामुळे धरणाचे काम करता येत नव्हते. आता ते डिजाईन मिळाले आहे. त्यामुळे निविदा मागविण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. धरणाच्या दुरुस्ती कामाची निविदा मागविली जाणार आहे. आणि धरणाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण केले जाईल.
- आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last element to count their dams ...