हापूस हंगाम अखेरच्या टप्प्यात

हापूस हंगाम अखेरच्या टप्प्यात

देवगड - अनेक अडचणींचा सामना करीत सुरू झालेला यंदाचा आंबा हंगाम आता अखेरच्या टप्यात आला आहे. वाशी बाजारात जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या असून केव्हाही कोसळणाऱ्या पावसाच्या भीतीने उरलासुरला आंबा झाडावरून खाली उतरवण्याची धांदल आहे. अखेरच्या टप्यात कॅनिंगलाही मुबलक आंबा मिळाला.

स्थानिक बाजारातही पिका आंबा विक्रीस येत आहे. यंदा सुरूवातीला आंबा हंगामाला निसर्गाच्या अपेक्षित साथ लाभली नाही. हवामानातील चढउतार, किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे पहिल्या टप्यातील आंब्याने बागायतदारांची निराशा केली. हंगामातील पहिल्या टप्यातील आंबा अडचणीत सापडल्याने हापूसचे ‘कॅश’ पीकच बागायतदाराच्या हातून निसटल्यासारखे झाले. त्यातूनही सावरत हंगामाची खडतर सुरूवात झाली; मात्र अखेरच्या टप्यातील उत्पादन समाधानकारक झाल्याने उरलीसुरली कसर भरून निघाली. यंदा अखेरच्या टप्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन झाले.

काही बागायतदारांकडे तुलनेत अधिक आंबा होता; मात्र अखेरच्या टप्यात आंबा असल्याने पावसाच्या भितीने बागायतदारांची चांगलीच धांदल उडाली. अखेरच्या टप्यात आंब्याचे प्रमाण अधिक राहिल्याने प्रक्रीया उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात आंबा वळला. आता हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. फळबाजारात आंबा जाण्याचे थांबले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात आंबा विक्रीस येत आहे. 

निसर्गाची साथ 
यंदा अवकाळी पावसापासून आंबा पीक बचावले. अजून येथे अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुरूवातीला निसर्गाने फटकारले असले तरी अखेरच्या टप्यातील उत्पादन बागायतदाराच्या हाती येण्यास मदत झाली. आता पावसाच्या भितीने बागायतदारांची धांदल वाढली आहे.    

यंदाच्या हंगामाची स्थिती
* पहिल्या टप्यातील आंब्याला हवामानाचा फटका
* पहिल्या टप्यातील मोहोर वाया
* अखेरच्या टप्यात भरपूर उत्पादन
* प्रक्रीया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात आंबा
* स्थानिक बाजारात आंब्याची मोठी उलाढाल

आता कॅनिंग व्यवसाय अंतिम टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यात कॅनिंगला आंबा अधिक आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३० टक्‍के अधिक आंबा प्रक्रिया उद्योगाकडे वळला. तालुक्‍यातून सुमारे १० हजार टनापेक्षा अधिक आंबा उद्योगाला मिळाला. बागायतदारांना कॅनिंगचा दरही समाधानकारक मिळाला.
- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com