लता कळंबेंचे आमरण उपोषण स्थगित

अमित गवळे
रविवार, 24 जून 2018

पाली : पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ (अ) या मार्गाच्या सुरक्षेसाठी व 'एम.एस.आर.डी.सी.' च्या गलथान कारभाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे सोमवार (ता.१८) पासुन आमरण उपोषणास बसल्या होत्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी (ता.२२) कळंबे यांनी उपोषण स्थगित केले.

लता कळंबे व लयभारी आदिवासी विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लाड यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची दिर्घकाळ विस्तृत चर्चा झाली. एम.एस.आर.डीसीचे अधिक्षक अभियंता कर्नल रविंद्र घोडके यांनी सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना येत्या १५ दिवसांत पुर्ण करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी उपोषणकर्त्या लता कळंबे यांच्यासह लयभारी आदिवासी विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लाड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता कर्नल रविंद्र घोडके,कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, नायब तहसिलदार वैशाली काकडे, पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे, बळीराम ठाकूर, मारुती शेलगावकर, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शिवमती वंदना मोरे, बाबूभाई धाईंजे, ठेकेदार अादी उपस्थित होते.

Web Title: Lata kambleche Amaran fasting adjourned