बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बचावला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कणकवली - तालुक्‍यातील नाटळ-गोसावीवाडी येथे आज सकाळी नऊच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. हल्ल्यात सुदैवाने शेतकरी बचावला. चंद्रकांत केशव गोसावी (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर कनेडी येथे एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

श्री. गोसावी हे जनावरे घेऊन घरापासून काही अंतरावर शेतात गेले होते. तेथे दोन बैलांची झुंज सुरू होती. ही झुंज सोडविण्यासाठी काठी घेऊन श्री. गोसावी पुढे जात असताना एका झुडपाच्या आडोशाला असलेला बिबट्या गोसावी यांच्यावर चाल करून गेला. हल्ल्यात गोसावी यांच्या हाताला चावा घेतला आहे. पायाला आणि डोक्‍यालाही हाताच्या पंजाने ओरखडेले आहे. श्री. गोसावी यांच्या हातात लाकडी दांडा असल्याने त्यांनी त्याला प्रतिकार केला, अन्यथा त्याच्या तावडीतून सुटले नसते. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचल्यानंतर श्री. गोसावी यांनी थेट घर गाठले. तेथे नातेवाइकांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी कनेडी येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शासकीय मदत तत्काळ देण्याचे मान्य केले.

Web Title: Leopard attack on Farmer