बिबट्याच्या हल्ल्यात वैभववाडी तालुक्यात पाच जनावरे ठार

बिबट्याच्या हल्ल्यात वैभववाडी तालुक्यात पाच जनावरे ठार

वैभववाडी - कोकिसरे घंगाळेवाडी येथे काल मध्यरात्री बिबट्याने धुमाकूळ घातला. भरवस्तीतील गोठ्यात घुसून बिबट्याने चार बकरे आणि एक शेळी ठार मारली. मृत चार बकरे व दोन शेळ्या गोठ्याशेजारी आढळून आले; तर दोन शेळ्या गायब असल्याचे सांगितले जात आहे.

तळेरे वैभववाडी मार्गालगतच्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परशुराम गोविंद मांजरेकर या शेतकऱ्याचे मोठे अार्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सकाळी वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.

परशुराम मांजरेकर हे गेली अनेक वर्षे शेळीपालन व्यवसाय करत आहेत. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी ३० शेळ्या विकल्या आहेत. त्यांच्याकडे चार बकरे आणि चार शेळ्या शिल्लक होत्या. शनिवारी रात्री १२ च्या सुमारास बंदिस्त असलेल्या गोठ्यात घुसून बिबट्याने चार बकरे आणि एका शेळीचा फडशा पाडला. तर दोन शेळ्या गायब आहेत.

गायब शेळ्या बिबट्यानेच पळविल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनपाल चंद्रकांत देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी स्वप्नील अम्बी, वनरक्षक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी मृतावस्थेत आढळलेल्या पाच बकऱ्यांचा पंचनामा केला. एकाच फटक्‍यात बिबट्याने शेळ्यांचा गोठा रिकामा केल्याने मांजरेकर यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com