वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

चिपळूण - चिपळूण-कराड मार्गावर पोफळी सय्यदवाडीजवळ मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. बिबट्याचे शवविच्छेदनानंतर वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यांत मृतावस्थेत सापडलेला हा तिसरा बिबट्या आहे.

तालुक्‍यातील पोफळी येथे वन विभागाचा तपासणी नाका आहे. येथील वनरक्षक सुर्वे यांना मृतावस्थेतील बिबट्याची माहिती पहाटे पाचच्या सुमारास मिळाली. सुर्वे यांनी ही माहिती परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना दिली. परिक्षेत्र वनअधिकारी सचिन निलख, फिरते पथक परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील, वनपाल  पताडे, वनरक्षक खेडेकर आदींनी सय्यदवाडी येथे धाव घेतली. प्रथमदर्शनी बिबट्याला कोणतीच इजा झाली नसल्याचे निदर्शनास आले.

पशुसवंर्धन अधिकाऱ्यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्याचा उजवा पाय पूर्णतः मोडला होता. तसेच पायाची कातडी देखील फाटल्याचे आढळले. चिपळूण-कराड मार्गापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदी आहे. रात्री बिबट्या पाणी पिण्यासाठी आला असावा. 

त्यावेळी मार्गावरून जाताना एखाद्या वाहनाची धडक बसली असावी. या धडकेतच त्याच्या पायाचा चुरा होऊन तो मृत झाला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: leopard death by vehical dash