वेगुर्लेत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

वेगुर्लेत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

वेंगुर्ले - येथील भटवाडी परिसरातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला अखेर यश आले. कॅम्प परिसरात राहणाऱ्या येथील गिरीश फाटक यांच्या शेत विहिरीत हा बिबट्या पडला  होता.

पहाटेपासून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे व नागरिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेरीस पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यात सकाळी उशिरा प्रयत्नांना यश आले आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाचे अधिकाऱ्यांनी मोहीम राबविली. बिबट्याला वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

दरम्यान बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समजताच स्थानिक तसेच वेंगुर्ले शहरातील बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com