कोकणात बिबट्याचा वावर : चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यात आले यश

राजेश कळंबट्टे | Thursday, 24 September 2020

पिंजरा विहिरीत टाकल्या वर अर्ध्या तासात बिबट्याला काढण्यात यश आले.

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गानजीक चरवेली येथील राजेंद्र लक्षुमण कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता.  वन खात्याने विहिरीत पिंजरा टाकताच बिबट्या आतमध्ये दाखल झाला.  त्यामुळे जास्त काळ त्याला काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. 

तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा वावर ठीक ठिकाणी आढळून येत आहे.  पावस येथे काही माणसांवर हल्लाही केला होता.  जंगल भागात वास्तव्य असलेले बिबटे. मनुष्य वस्तीजवळ खाद्य शोधण्यासाठी येत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे असाच एक बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आले आहे. कुरतडकर यांची विहीर असून त्यात बिबट्या पडल्याची माहिती मिळताच सर्वानी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती वन विभागाला कळवण्यात आली आहे.  

वन विभागाचे पथक  घटनास्थळी दखल झाले आहे.  विहिरीत पाणी असल्यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वेळ लागेल असे अपेक्षित होते.  मात्र वन विभागाचे पथक पोचल्यावर ऑपरेशन सुरु झाले. पिंजरा विहिरीत टाकल्या वर अर्ध्या तासात बिबट्याला काढण्यात यश आले. पाण्यात बसण्यासाठी जागा नसल्यामुळे बिबट्या लगेच पिंजऱ्यात आला.  त्यामुळे जास्त काळ  प्रतीक्षा करावी लागली नाही. 

हेही वाचा- ‘नाणारच्‍या चौदाशे एकर जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक’ -

विभागीय वन अधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र  वन अधिकारी  प्रियंका लगड वनपाल पाली जी. पी कांबळे, वनपाल देवरुख सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे,  संजय रणधीर यांनी बिबटयास सुखरूप विहिरीतून काढून पशु वैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी यांचेकडून तपासून घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले.
 

वय 1-2 वर्ष 
जात- मादी
लांबी - 155
उंची - 48सेमी

संपादन - अर्चना बनगे