सावंतवाडीत आढळला बिबट्या

Leopard found in Sawantwadi
Leopard found in Sawantwadi

सावंतवाडी : येथील सातार्डा कवठणी भागात फासकीत बिबट्या अडकल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. रस्त्याच्या बाजूलाच ही घटना घडल्यामुळे त्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विभाग तसेच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.

उशिरापर्यंत त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभाग सापळा घेऊन प्रयत्नशील होता. उशीरापर्यंत मदत कार्य सुरू होते. याबाबत सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश कवठणकर यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com