रत्नागिरीतील वरवडे-मराठवाडीत बिबट्याची शिकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

रत्नागिरी - तालुक्‍यातील वरवडे-मराठवाडी येथे बिबट्याची शिकार केल्याचा गंभीर प्रकार आज उघड झाला. येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या मानेत दोन छर्रे मिळाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध वन विभागाने वन्यजीव अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे वनपाल एल. बी. गुरव यांनी सांगितले.

वरवडे पोलिसपाटील यांना ही माहिती मिळाली. मानवी वस्तीजवळ वरवडे-मराठवाडा येथे बिबट्या मृत पडल्याची माहिती वनपाल गुरव यांना मिळाली. ते तत्काळ परमेश्‍वर डोईफोडे व सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पंचनाम्यात बिबट्याच्या मानेजवळ जखमा दिसल्या. विच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. विच्छेदन झाल्यानंतर मानेजवळ बंदुकीतून सुटलेल्या गोळीपैकी दोन छर्रे मिळाले. यावरून बिबट्याची शिकार केल्याचा निष्कर्ष वन विभागाने काढला आहे. रात्री या बिबट्याची गोळ्या झाडून शिकार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दोनच छर्रे लागल्याने बिबट्या लांबचा पल्ला गाठून वरवडे-मराठवाडी येथे आला असावा. शिकारीचा प्रकार अन्य ठिकाणी झाला असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे. वन विभागाने वन्यजीव अधिनियमानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Leopard hunting in Ratnagiri Taluka