विहिरीत पडलेल्या बिबट्याला रत्नागिरीत जीवदान

राजेश शेळके
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

रत्नागिरी - भक्ष्याचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याचा प्रकार उघड झाला. शहराजवळील खेडशी येथे हा प्रकार घडला. वन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजर्‍यात जेरबंद केले. त्यानंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात विन विभागाला यश आले. 

रत्नागिरी - भक्ष्याचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याचा प्रकार उघड झाला. शहराजवळील खेडशी येथे हा प्रकार घडला. वन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजर्‍यात जेरबंद केले. त्यानंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात विन विभागाला यश आले. 

खेडशी येथील श्री. मेस्त्री यांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वन विभागाला बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. रोहित राजेंद्र चव्हाण यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पालीचे वनपाल एल. बी. गुरव, संगमेश्‍वरचे वनपाल सुरेश उपरे, राजापूरचे वनपाल कोर मॅडम, वनरक्षक परमेश्‍वर डोईफोडे, मिताली कुबल, राहुल गुंढे, न्हानू गावडे व लांजाचे वनपाल पी. जी. पाटील घटनास्थळी दाखल झाले.

कुत्रा किंवा मांजराला भक्ष करण्यासाठी बिबट्याने पाठलाग केला असावा. कारण विहिरीवर जाळे होते. कदाचित मांजर त्या जाळ्यावरून निघून गेले. बिबट्याचे वजन न पेलल्याने जाळे तुटून तो विहिरीत पडला असावा

- एल. बी. गुरव, वनपाल

बिबट्या रात्री विहिरीत पडला होता. याची माहिती मिळताच या भागातील अनेक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यास गर्दी केली. गर्दीला पांगवत वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने मोहीम सुरू केली. रात्रभर पाण्यात पोहून बिबट्या थकला होता. त्याच्या सुरक्षेसाठी आणि आधार मिळण्यासाठी वन विभागाने दोरीच्या साह्याने दोन लाकडी फळ्या विहित सोडल्या. बिबट्याने फळ्यांचा आधार घेतला. त्यानंतर वन विभागाने त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरी मोहीम आखली. 

पकडलेला बिबट्या

  •  नर बिबट्या होता
  •  वय सुमारे तीन ते साडेतीन वर्षे 
  • लांबी  सुमारे 7 फूट
  • उंची अडीच फूट

पिंजरा आणून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. पिंजरा दोरीच्या मदतीने विहिरीत सोडला. मात्र तो पिंजर्‍यात येत नव्हता.  अर्ध्या तासानंतर बिबट्या पिंजर्‍यात आला. त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढले. बिबट्याला जवळून पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावून बिबट्याची तपासणी केली. त्याची प्रकृती स्थिर असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

Web Title: Leopard in Khedoshi Ratnagiri District