बिबट्याचे कातडे खारेपाटणमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कणकवली - खारेपाटण येथे सापळा रचून १० लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास खारेपाटण पोलिस चेकपोस्टवर केली.

कणकवली - खारेपाटण येथे सापळा रचून १० लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास खारेपाटण पोलिस चेकपोस्टवर केली.

याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नीलेश विवेक मांडवकर (वय २९, रा. राजापूर कोंड्ये), परिक्षेत्र जितेंद्र मयेकर (२५, रा. दापोली) आणि गोपाळ गणपत गडवार (३९, राजापूर हर्डी) अशी  संशयितांची नावे आहेत. तिघेजण मोटारीतून राजापूर ते कणकवली अशी कातड्याची वाहतूक करत होते. 

बिबट्याच्या कातड्याची मोठी तस्करी सह्याद्रीच्या पट्ट्यात केली जाते. विशेषतः देवगड, राजापूर या भागात कातडी खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होतात. अशाच एका व्यवहाराची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला आज मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस आणि कणकवली वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांच्या पथकाने सापळा रचला.

दरम्यान, मोटारीतून राजापूरहून तिघे संशयित बिबट्याचे कातडे घेऊन निघाल्याची माहिती वनक्षेत्रपाल यांना देण्यात आली. पथकाने खारेपाटण चेकपोस्ट येथे कारवाई केली. संशयितांना १० लाखांच्या कातड्यासह मोटार जप्त केली. गेल्या महिन्यात नांदगाव येथे अशीच कारवाई झाली होती.

Web Title: Leopard Leather seized in Kharepatan