विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

दापोली - शहरानजीक जालगाव-कुंभारवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले. सुमारे एक वर्षाचा हा बिबट्या होता. तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान देण्याची चार वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले.

जालगाव-कुंभारवाडी येथे सखाराम दाभोळकर यांची राहत्या घराशेजारी खासगी विहीर आहे. आज सकाळी श्री. दाभोळकर विहिरीवर गेले असता विहिरीत कोणीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वाहिले असता बिबट्या असल्याचे समजले. विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली. ही माहिती त्यांनी शेजाऱ्यांना दिली. 

वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन वन विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वरक, वनपाल मारुती जांभळे, वनरक्षक अमित निमकर, विजय तोडकर, एम. जे. पाटील, सहयोग कराडे आदी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

ेया घटनेची खबर दापोली पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक सागर पवार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यानंतर विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. ज्या विहिरीत बिबट्या पडला होता ती विहीर सुमारे चाळीस फूट खोल होती. विहिरीतील पंपावर बिबट्या बसला होता. सोडलेल्या पिंजऱ्यामध्ये येण्यास बिबट्या बाहेर असलेल्या गोंधळामुळे अनुत्सुक होता; मात्र सुमारे अर्धा तास त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर बिबट्या पिंजऱ्यात बसला. त्यामुळे साऱ्यांनीच निःश्‍वास सोडला. हा बिबट्या एक वर्षाचा नर जातीचा आहे.

Web Title: leopard life saving