मळेवाड परिसरात बिबट्याच्या संचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

सावंतवाडी : मळेवाड, माळकर टेंबवाडी येथील माळरानावर बिबट्याच्या हल्ल्यात गाभण गाय मृत्युमुखी पडल्याचा प्रकार घडला. ही घटना नुकतीच उघडकीस आली.

गेल्या काही दिवस बिबट्याचा संचार या परिसरात वाढला असून बिबट्याने एका आठवड्यात तीन गायींचा फडशा पाडला आहे. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मळेवाड माळकरटेंब येथील जनार्दन नाईक यांनी आपली गाय या परिसरातीलच जंगली भागात माळरानावर चरण्यासाठी सोडली होती. रात्री उशिरापर्यंतही गाय परतलीच नसल्यामुळे श्री. नाईक यांनी सकाळी सर्वत्र शोधाशोध केली असता, बाजूस असणाऱ्या जंगली माळरानावर त्यांना गाभण गायीचा मृतदेह सापडला.

गेल्या काही दिवसापासुन मळेवाड कोंडुरे व आरोस परिसरात बिबट्या मुक्त संचार आहे. मागील दोन आठवड्यात या परिसरात दोन गायी मृत्युमुखी पडल्याच्या घटना ताजी असतानाच नाईक यांच्या गायीचाही मृतदेह सापडल्याने पाळीव जनावरांना चरण्यासाठी सोडणे ग्रामस्थांना भीतीदायक वाटत आहे. श्री. नाईक यांच्या गायीचा आजगाव वनविभागक्षेत्राचे वनरक्षक बी. ए. काटके, व वनपाल विशाल पाटील यांनी संबधित घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Leopard seen in malewad

टॅग्स