"एक्‍स्प्रेस वे'वर रस्ता सुरक्षेचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

खोपोली - लेनची शिस्त पाळाल, वेग मर्यादित ठेवाल आणि इंडिकेटरचा वापर कराल तर बहुतांश अपघातांना आपोआप आळा बसेल, असा मोलाचा सल्ला रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी दिला. 

खोपोली - लेनची शिस्त पाळाल, वेग मर्यादित ठेवाल आणि इंडिकेटरचा वापर कराल तर बहुतांश अपघातांना आपोआप आळा बसेल, असा मोलाचा सल्ला रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी दिला. 

ते म्हणाले की, आपण चूक करतो आहोत याची जाणीव झाल्यावर लगेच त्यात सुधारणा झाल्यास हानी होत नाही. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी महामार्ग पोलिस, आयआरबी, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी; तसेच विद्यार्थी उपस्थित होते. महायुद्धात जेवढी झाली नाही, तेवढी जीवितहानी रस्ते अपघातात होते, अशी खंत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. "व्हिली बॉईज' या रस्तासुरक्षेचे काम करणाऱ्या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील वाहतूक शाखा व पोलिस कर्मचाऱ्यांना पाच हजार हेल्मेट भेट म्हणून दिल्या. यासाठी गोल्फ ऑईल कंपनीने मदत केल्याची माहिती विजय जैन यांनी दिली. राधे फाऊंडेशनच्या "वे टू ऍम्ब्युलन्स' मोहिमेच्या पत्रकांचे डॉ. रिटा सावला व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी "आयआरबी'चे कर्नल जोस्वा, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत मोहिते, अँडलब इमॅजिकाचे रवी कुलकर्णी, गोल्फ ऑईलचे विनायक जोशी उपस्थित होते. ऍडलॅब इमॅजिकाच्या कलाकारांनी कलागुणांचे सादरीकरण केले. लोककलाकार बाशाभाई समूहाने धोकादायक कसरती लीलया दाखवून मनोरंजन केले. एपीआय वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले; तर पोलिस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी आभार मानले.

Web Title: Lessons on road safety Expressway