मांडवी, कोकणकन्येत लवकरच एलएचबी कोच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

एक नजर

  • कोकण रेल्वे मार्गावरील लोकप्रिय मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचे रूप पालटणार
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले एलएचबी कोचची प्रवासी सुरक्षेसाठी सुविधा
  • येत्या पावसाळ्यात ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता

 

कणकवली - कोकण रेल्वेने आतापर्यंतच्या सेवेत प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधेवर अधिक भर दिला आहे. प्रवासी सुरक्षा व सोयीसुविधा सुधारण्यासाठी पुढाकार म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील लोकप्रिय मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचे रूप पालटणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले एलएचबी कोच असलेल्या गाड्या या मार्गावर धावणार आहेत. येत्या पावसाळ्यात ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. रेल्वेने आपल्या संकेतस्थळावरून तशी माहिती प्रसिद्ध केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक १०१०४ / १०१०३ मडगाव ते मुंबई तसेच  गाडी क्रमांक १०११२/१०१११ मडगाव जंक्‍शन ते- मुंबई सीएसएमटी - मडगाव  या दोन्ही गाड्यांच्या आयसीएफ डिझाइन रेक बदलून आधुनिक एलएचबी डिझाइन कोच बसवले आहेत. या गाड्यांच्या सध्या चाचण्या घेतल्या जात आहेत. प्रवासी सुरक्षेसाठी एलएचबी कोच तयार केले आहेत.  

सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेले एलएचबी कोच स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत. आंतरिक भाग ॲल्युमिनियमपासून बनविलेला आहे, जे पारंपरिक रेक्‍सच्या तुलनेत अधिक हलके आहे. देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी आहे. प्रत्येक कोचमध्ये वेगवान वायुमापक डिस्क ब्रेक सिस्टम आहे. उच्च गती, मॉड्युलर इंटेरियर्स, छतावर आणि सामानाच्या रॅकमध्ये, मोठ्या खिडक्‍यांत प्रकाश टाकून उच्च कार्यक्षमतेने ब्रेकिंगसाठी बनविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LHB coaches in Mandvi and Konkankanya Trains