‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चा किताब कोण पटकावणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

रत्नागिरी - ‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’ला यावर्षीही १२ ‘लिटिल व्हॉइस’मध्ये चुरस होणार आहे. यामधून यावर्षीचा ‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चा किताब कोण पटकावणार, याची उत्सुकता आहे. ७ जानेवारीला सावरकर नाट्यगृहात ६.३० वाजता ही स्पर्धा होणार आहे. 

स्पर्धेला सेलिब्रेटी परीक्षक म्हणून आघाडीचा गायक, संगीतकार, अभिनेता अजित परब येणार आहे. लांजा व दापोलीमध्ये ऑडिशनची दोन केंद्र वाढविण्यात आली. यावर्षी रत्नागिरी, दापोली, चिपळूण, लांजा अशा चार ठिकाणी ऑडिशन्स जिल्हाभरात घेण्यात आल्या. या निवडफेऱ्यांत परीक्षक म्हणून पांडुरंग बर्वे आणि अभिजित नांदगावकर यांनी काम पाहिले. 

चिपळूणमधून तन्वी कुलकर्णी, साक्षी उत्पात, गंधाली भागवत, रत्नागिरीतून- कुणाल साळवी, तेजस साठे, साक्षी जांभेकर, पौर्णिमा कीर, दापोलीतून संस्कृती पाटील, मृण्मयी महाडिक, लांज्यातून श्रेया भागवत, सिद्धी पेडणेकर आणि स्वरांगी भाकलकर यांची निवड करण्यात आली. या सर्वांमधून एक ‘लिटिल व्हाइस ऑफ रत्नागिरी’चा किताब पटकावणार आहे.

Web Title: little voice of ratnagiri competition