कर्जाची मुदतीत परतफेड करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

मालवण - "संस्था सभासदांकडून कर्जाची परतफेड मुदतीत न झाल्यास संस्थेच्या प्रगतीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यावर कटू कारवाई करावी लागते. शिवाय याचा आर्थिक भुर्दंडही संस्थेच्या नफ्यावर होतो. त्यामुळे सभासदांनी कर्जाची नियमित व मुदतीत फेड करावी,‘ असे आवाहन तालुका विकास कार्यकारी सहकारी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष सुभाष तळवडेकर यांनी केले.

तालुका विकास कार्यकारी सहकारी ग्रामउद्योग संघ मर्यादित संस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष तळवडेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी तळवडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव झाला. या वेळी संतसेना नाभिक व्यावसायिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, बाबाजी मेस्त्री, नरहरी परुळेकर, अरुण वालकर, भिवा तळगावकर, सुधाकर माणगावकर, अंकुश वडवलकर, माधुरी बेलवलकर, सुप्रिया तावडे, रमेश मेस्त्री, रामचंद्र जंगले आदी उपस्थित होते.

या वेळी गतवर्षी संस्थेमार्फत संस्थेच्या मागासवर्गीय 11 नवीन कारागीर सभासदांना 2 लाख 20 हजार इतके संस्थेने कर्ज वितरण केले आहे. मार्च 2016 अखेर 94 सभासदांकडे 4 लाख 54 हजार रुपयांची थकबाकी असून, 26 सभासदांवर कारवाई झाली आहे. संस्थेला लेखापरीक्षण ब वर्ग मिळाला आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने सभासदांना दिली.

Web Title: The loan repayment period