सिंधुदुर्गमध्ये पाळला असा लॉकडाऊन ; नागरिकांनी दिली अशी साथ...

lockdown impact for sindhudurg district
lockdown impact for sindhudurg district

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील शहरांमध्ये आज कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलीही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले नाहीत. शिवाय विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनीही पोलिसांनी सूचना दिल्या व दम भरला. शहरात स्थानिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसह होमगार्ड व दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी देखरेख तसेच तैनात करण्यात आले होते.

 स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड तसेच सिंधुदुर्ग मुख्यालयाकडून दंगल नियंत्रण पथक  तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी शहरातील विविध भागातून पेट्रोलियम केले. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दोन ते सहा या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर केले आहे.  याला जनतेनेही तसेच व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अचानक रुग्ण वाढीचा वेग वाढला असल्याने जिल्हाधिकारी मंजूलक्षमी यांनी हा निर्णय घेतला आहे. याला लॉकडाऊनबाबत काही नागरिक आणि व्यापाऱ्यात नाराजी असलेले दिसून आली.

यावेळी शहरात मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते तसेच दूध विक्रेते याव्यतिरिक्त अन्य सर्व मोबाईल, भांडी, इलेक्ट्रॉनिक ,पान टपरी हॉटेल चहाच्या टपऱ्या आधी सर्व दुकाने बंद असलेले दिसून आली होती.आजच्या लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची पुनरावृत्ती झालेली दिसून आली. गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुरू झालेली बस सेवा यात बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरी भागात नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली. 

ग्रामीण भागात मात्र याला काही व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिक मात्र ग्रामीण भागात फिरताना दिसून येत होते. येथील शहरात आज सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्‍णासो बाबर यांनी स्पीकर द्वारे नागरिकांना लॉकडाऊन चे नियम सांगून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक पोलिस पोलिसांचं विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांचा समाचार घेतला. ई पास द्वारे वाहतूक करणारी काही वाहने रस्त्यावर दिसून आली. लाकडांच्या पार्श्वभूमीवर येथील शहरांमध्ये येथील पोलिस ठाण्याचे 20 स्थानिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर शहराच्या विविध भागात 25 होमगार्ड आणि 10 ते 15 जणांचे दंगल नियंत्रण पथक आधीचं कडकडीत बंदोबस्तात मध्ये सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com