कोकणात महिलांना मिळणार रोजगाराच्या संधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

देवरुखात आयोजन ; महिलांच्या हाताला मिळणार काम

देवरूख : सध्याच्या कोरोना संकट काळात अनेक महिला बेरोजगार आहेत. अशा महिलांसाठी लायन्स क्‍लब ऑफ देवरूख, स्नेह परिवार आणि मातृमंदिर देवरूख यांनी रोजगार कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेंतर्गत जुन्या कापडांपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत खाजगी रुग्णालयातील बिलांवर ऑडीटरची नजर 

कोरोना महामारीचा सगळीकडे थैमान सुरु आहे. या संकट काळात हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांवर उद्योगधंदे बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. त्यामुळे नागरिक भितीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना उद्‌भवणारी ही स्थिती बदलण्याचा एक विशेष प्रयत्न 'लायन्स क्‍लब ऑफ देवरूख' स्नेह परिवार आणि मातृमंदिर देवरूख यांनी सुरू केला आहे. 

कोरोना काळात बेरोजगार महिलांसाठी जुन्या वापरात नसलेल्या कापड्यांपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना रोजगार उपलब्धीची संधी ही दिली जाणार आहे. जुन्या मात्र अति जीर्ण नसलेल्या कॉटन किंवा सिंथेटिक साड्या, जुने ड्रेस, सलवार, जीन्स सारखे कपडे बेडशीट्‌स, उशीचे अभ्रे, सोफा कव्हर या वस्तू उपलब्ध झाल्यास अतिशय चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होवून महिलांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध होईल. यासाठी हेगशेट्ये स्क्‍वेअर, नवनिर्माण कॉलेज बिल्डींग, अपना बॅंकेसमोर, पहिला मजला, बाजारपेठ, देवरूख या ठिकाणी जूने कपडे आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचा - ...अखेर शल्य चिकित्सक पदाच्या वादावर पडदा ; डॉ. बोल्डे यांची बदली

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown period women employment opportunities in ratnagiri under the activity of club