लोको पायलटचे रत्नागिरीत कामबंद

राजेश कळंबटे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

रत्नागिरी - आठ तासाची विश्रांती घेऊ न देता लोको पायलटला पुन्हा गाडी चालवण्याची जबरदस्ती कोंकण रेल प्रशासनाकडून करण्यात आल्यामुळे संतापलेल्या कर्मचारी संघटनेने काम बंद चा पवित्र घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. कर्मचार्यल सूट देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर एक तासांनी काम बंद मागे घेण्यात आले.

रत्नागिरी - आठ तासाची विश्रांती घेऊ न देता लोको पायलटला पुन्हा गाडी चालवण्याची जबरदस्ती कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्यामुळे संतापलेल्या कर्मचारी संघटनेने काम बंदचा पवित्र घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. कर्मचाऱ्याला सूट देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर एक तासांनी काम बंद मागे घेण्यात आले.

लोको पायलटला आठ तास काम केल्यानंतर आठ तास विश्रांती अत्यावश्यक असते. रोहा येथे असलेल्या एका लोको पायलटला प्रशासनाने सहा तास विश्रांती झाल्यानंतर दुसरी गाडी रत्नागिरीकडे घेऊन येण्यास सांगितले. त्या कर्मचाऱ्याने पूर्ण विश्रांती झाली नसल्यामुळे गाडी चालवण्यास नकार दिला.

रेल्वे प्रशासनाने तात्काळ त्या कर्मचाऱ्याला रत्नागिरीत बोलावून कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याच्यावर कारवाईचा पवित्रा घेतला. हा प्रकार समजल्यानंतर मान्यताप्राप्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने कामबंद चा निर्णय घेतला. अत्यावश्यक कामासाठी ड्युटीवर असलेल्या रत्नागिरी कार्यालयातील 38 कर्मचार्यांनी तात्काळ कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.

रात्री नऊवाजेपर्यंत यावर चर्चा सुरु होती. यामध्ये युनियनचे कुमार घोसाळकर यांनी प्रशासनाशी चर्चा केली. पूर्ण बाजू समजून घेतल्यानंतर प्रशासनाने लेखी पत्र देत उद्या चर्चा करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. एक तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुदैवाने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार नाही याची काळजी घेत प्रशासनाने तोडगा काढला. 

रेल्वे प्रशासनाने नियमाला धरून काम केले पाहिजे. लोको पायलटकडे मोठी जबाबदारी असते. लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. उद्या यावर चर्चा होईल. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर पुन्हा आंदोलन करू.

- कुमार घोसाळकर, युनियन नेते

Web Title: Loco Pilots in Ratnagiri on common off