लोहार माळ दरोडा; सात जणांना सक्तमजुरी

सुनील पाटकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

महाड : गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावात 25 नोव्हेंबर 2015 रोजी एका घरावर टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस.जहागीरदार यांनी सात आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेलार ढाब्याच्या मागील बाजूला संदीप नरे यांची भातगिरणी आणि घर आहे. 25 नोव्हेंबर 2015 ला रात्री सव्वादहाला एका अज्ञात व्यक्तीने भात भरडायचे असे सांगून पिण्याच्या पाण्याची मागणी केली. यावेळी संदीपच्या आजीने घराचा दरवाजा उघडून ती पाणी आणण्यास घरात गेली असता सहा अनोळखी इसम घरात घुसले. दरोडेखोरांनी घरातील कपाटाच्या तिजोरीतून सर्व दागिने,रक्कम,मोबाईल असा तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी पोलिसांनी देवा मोहिते, सूरज जाधव, आदित्य मोहिते, प्रणिल पाटेकर, रोशन म्हात्रे, दिलीप मोरे आणि दिवेश देशमुख यांना अटक केली होती. या सर्वांना दहा वर्षांची सक्तमजुरीबरोबर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास शिक्षा ठोठावली आहे. या आरोपींनी पेण येथे सशस्त्र दरोडा घालण्याचा कट रचल्याचे पुढे आले.सरकरच्या वतीने या प्रकरणी 19 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुराव्याअंती हा निकाल न्यायालयाने दिला.

Web Title: Lohar Mal Robbery Seven Persons Imprisonment