LokSabha 2019 : प्रकाश देसाईंचा राष्ट्रवादीला पुन्हा एकदा रामराम; पुन्हा शिवबंधन बांधले

pali.jpg
pali.jpg

पाली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी ऐंन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत प्रकाश देसाई यांनी शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला. तसेच माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निच्छीत झाले असल्याने राष्ट्रवादीला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोन मोठे धक्के बसणार आहेत.

रविवार (ता.17) प्रकाश देसाई यांची मुंबईत शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळी व प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत बैठक होणार आहे. प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख पदाचा राजिनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. देसाई यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करते वेळी व इतर कार्यक्रमात देखील सुनिल तटकरे यांनी देसाई यांना वारंवार ठणकावून सांगितले होते की, ''आता तुमचे परतीचे दोर कापले गेले आहेत.'' परिणामी आता प्रकाश देसाईंनी ऐन लोकसभा निव़डणुकीतच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता सुनिल तटकरे हे प्रकाश देसाई यांच्या विरोधात कोणती भुमिका घेतील? याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते.

पक्षात आपल्याला वारंवार डावलले जात असल्याचे व निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याची खंत प्रकाश देसाई यांनी व्यक्त केली. तसेच वसंत ओसवाल आणि इतर पदाधिकारी यांच्याकडून वारंवार दुजाभाव मिळाला. पक्षवाढीसह सामाजिक काम करताना सुध्दा अनेक वेळा मोकळेपणाने काम करण्यास मुभा नव्हती. त्यामुळे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी हाती असूनही घुसमट होत असल्याची भावना मनाला सतत बोचत होती. याउलट शिवसेनेत असताना शिवसेनेच्या वरीष्ट नेत्यांनी शिवसेनेच्या रायगड जिल्हाप्रमुख पदासारखी महत्वपुर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. महत्वपुर्ण निर्णय घेण्याची मुभा आणि मोकळीक शिवसेनेत होती. त्यामुळे दडपण नव्हते. मात्र दरम्यानच्या काळात शिवसेनेत काही गैरसमज निर्माण झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.

या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी वारंवार मनधरणी केली.  पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल व मोठी जबाबदारी सोपवून कुठलेही मतभेद व पुर्वग्रह दूषित न ठेवता मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली जाईल असे आश्वासीत केले होते. मात्र काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सतत घुसमट होत असल्याचे जाणवले. असे देसाईंनी स्पष्ट केले. आगामी काळात आता पुन्हा एकदा प्रकाश देसाई शिवसेनेत सुध्दा किती दिवस तग धरुन राहतील हे येणारा काळच ठरवेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com