Loksabha 2019 : सुनील तटकरेंची संपत्ती पावणेतेरा कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

दाभोळ - रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे कुटुंबाच्या संपत्तीत पाच वर्षात सुमारे पावणेतीन कोटींची वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

दाभोळ - रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे कुटुंबाच्या संपत्तीत पाच वर्षात सुमारे पावणेतीन कोटींची वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

या शपथपत्रात सुनील तटकरे व पत्नी वरदा तटकरे यांनी आपली एकूण संपत्ती १२ कोटी ७४ लाख ८७ हजार २७७ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तटकरे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात दाखल केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत २ कोटी ६८ लाख ४४ हजार १४१ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. तटकरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शपथपत्रात जाहीर केलेली सुनील व वरदा तटकरे यांची एकूण संपत्ती १० कोटी ६ लाख ४३ हजार १३६ होती. त्यात ३ कोटी ३३ लाख ३३ हजार ३०३ रुपयांची जंगम मालमत्ता (दागिने, रोकड, बॅंक शिल्लक, वाहने) होती तर ६ कोटी ७३ लाख ९ हजार ८३३ इतकी स्थावर मालमत्ता होती. २०१४ च्या शपथपत्रानुसार सुनील तटकरे हे स्टेट बॅंक, मादाम 
कामा रोड (मुंबई) शाखेकडून २४ लाख ८२ हजार ६०२ रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेतला होता, तर २०१९ च्या शपथपत्रात सुनील तटकरे यांचे याच बॅंकेचे ३२ लाख २१ हजार ७३ रुपयांचे वाहन तारण कर्ज देणे असल्याचे म्हटले आहे.

४ कोटी ५५ लाख १२ हजारांची जंगम मालमत्ता
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात जाहीर केलेली सुनील व वरदा तटकरे यांची एकूण संपत्ती १२ कोटी ७४ लाख ८७ हजार २७७ आहे. त्यात ४ कोटी ५५ लाख १२ हजार २७७ रुपयांची जंगम मालमत्ता (दागिने, रोकड, बॅंक शिल्लक, वाहने) होती. ८ कोटी १९ लाख ७५ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sunil Tatkare property