कोकण रेल्वे प्रवाशांना खुषखबर; धावणार 'ही' विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

प्रवाशांचा सर्वाधिक भार हा कोकणकन्या, तुतारी, दादर - सावंतवाडी, रत्नागिरी - दादर, जनशताब्दी या गाड्यांवर असतो. त्यासाठी विशेष गाडी सोडावी, अशी मागणी कोकणवासीयांकडून करण्यात आली होती.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या सहकार्याने मडगाव ते दादर पर्यंत विशेष रेल्वे गाडी चालविण्याची मागणी रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. ती मान्य झाली असून ती गाडी मध्यरात्री एक वाजता मडगाव येथून सुटणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नॅव्हिगेशनवरद्वारे होते शस्त्रक्रिया; हे जाणून घेण्याची येथे संधी 

दिवाळी, गणपतीसह सणांच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. हा मार्ग एकेरी असल्यामुळे जादा गाड्या चालविणेही शक्‍य होत नाही. दुपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीरचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर बहूतांश वेळात्रक सुरळीत चालणार आहे.

‘मिस वेंगुर्ला २०१९‘ स्पर्धेत सावंतवाडीच्या हिने पटकावला प्रथम क्रमांक 

प्रवाशांचा सर्वाधिक भार हा कोकणकन्या, तुतारी, दादर - सावंतवाडी, रत्नागिरी - दादर, जनशताब्दी या गाड्यांवर असतो. त्यासाठी विशेष गाडी सोडावी, अशी मागणी कोकणवासीयांकडून करण्यात आली होती. हा मुद्‌दा खासदार राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मांडला होता. ती मागणी मान्य झाली असून मडगाव - दादर गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आली आहे. ही गाडी मध्यरात्री 1 वाजता मडगांववरून सुटणार आहे. त्या गाडीला 14 डब्बे असतील.

रत्नागिरी : सीआरझेड कचाट्यातून हे चार धूप प्रतिबंधक बंधारे मुक्त 

या विशेष गाडीस येथे थांबे

ही विशेष गाडी थिविंम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. ओरोस स्थानकावर गाडीला थांबा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madgaon Dadar Special Train on Konkan Railway Track