महाआरोग्य शिबिर ग्रामस्थांसाठी संजीवनी - राजेंद्र महाडिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

रत्नागिरी - ‘ग्रामीण भागातील रुग्णांना हे महाआरोग्य शिबिर म्हणजे संजीवनी आहे. डॉक्‍टरांना ते देवदूत मानतात. जिल्हास्तरीय आरोग्य शिबिर हरचिरीसारख्या ग्रामीण भागात घेणे शक्‍य नाही; परंतु जिल्हा परिषद, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर, पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर आदींनी ते यशस्वी करून दाखविले, हे कौतुकास्पद काम आहे’, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी केले.

हरचिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले, आरोग्य सभापती सौ. देवयानी झापडेकर, संजय पुनसकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, उद्योजक आणि आरडीसीसी बॅंकेचे संचालक किरण ऊर्फ भैया सामंत, उपजिल्हाप्रमुख आणि उपनगराध्यक्ष राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर, राकेश साळवी, पिंट्या साळवी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांचे निदान आणि त्यावर उपचार व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात आले. सुमारे साडेसहाशे लोकांनी शिबिराचा लाभ घेतल्याचे श्री. झापडेकर यांनी सांगितले. 

श्री. महाडिक म्हणाले, ‘ग्रामीण भागातील लोकांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी या शिबिरामार्फत मिळाली. जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिर असतानादेखील ते चिपळूण किंवा अन्य भागात जाण्याची शक्‍यता होती; परंतु महेंद्र झापडेकर, सौ. झापडेकर यांच्यासह अनेकांनी ते हरचिरीमध्ये व्हावे, यासाठी आग्रह धरला होता. त्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिश्रा, आरोग्य अधिकारी श्री. आठले यांच्यासह सर्वांनी संमत्ती दर्शविली. त्याचे नेटके नियोजन करून श्री. झापडेकर यांनी महाआरोग्य शिबिर यशस्वी करून दाखविले. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. आरोग्य सुदृढ तर सर्व काही.’

Web Title: mahaaarogya camp for public