महाड: शाळेत झाड कोसळून 20 मुली जखमी

सुनील पाटकर
बुधवार, 28 जून 2017

झाडाच्या फांद्यांमुळे वीस मुलींना किरकोळ दुखापती झाल्या तरीही शाळा व्यवस्थापनाने या सर्व मुलींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.येथे सोळा मुलींवर उपचार करुन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक संजय चिखले यांनी सांगितले.

महाड - पोलादपूर तालुक्यातील कापडे येथील श्रीवरदायिनी माध्यामिक विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थना सुरु असताना अचानक झाड कोसळल्याने शाळेतील वीस मुली जखमी झाल्या आहेत.

आज (बुधवार) सकाळी 10.20 वाजता ही घटना घडली.शाळा व्यवस्थापनाने तातडीने जखमींना उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जखमी झालेल्या मुली सहावी ते नववीच्या वर्गातील आहेत. कापडे येथील श्रीवरदायिनी माध्यामिक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10.20 वाजता नेहमी प्रमाणे प्रार्थना सुरु होती याच दरम्यान शाळे जवळील एक झाड मैदानावर कोसळले परंतु सुदैवाने मुली यातून बचावल्या. झाडाच्या फांद्यांमुळे वीस मुलींना किरकोळ दुखापती झाल्या तरीही शाळा व्यवस्थापनाने या सर्व मुलींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.येथे सोळा मुलींवर उपचार करुन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक संजय चिखले यांनी सांगितले. अन्य साक्षी साने, सोनाली कांबळे व दिक्षा पवार या तीन मुलींना पुढील उपचारासाठी महाड येथील रानडे रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
93 बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू
मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज
1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​

Web Title: Mahad: 20 girls injured in tree collapse in school

टॅग्स