पुलवामातील हल्ल्याच्या निषेधार्थ महाडकर उतरले रस्त्यावर

mahad
mahad

महाड : ''पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज महाड मधील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. तर, शहरातील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून या निषेध रॅलीत सहभाग घेतला. शहरातील शिवाजी चौक येथे पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.

 महाड मधील सर्व संघटनानी एकत्र येत पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रॅली काढली. छ. शिवाजी महाराज चौक येथून या रॅलीला सुरवात झाली. यावेळी महाड शहरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणवर एकत्रित आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत शहरातील प्रत्येक नाक्यावर प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. शहर जवळपासचे हजारो नागरिक यावेळी उपस्थित राहिले. महाड शहर बंदची हाक देखील देण्यात आल्याने संपूर्ण बाजारपेठ आज स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली.

शहरातील विक्रम आणि रिक्षा मात्र सुरळीत ठेवण्यात आल्या होत्या. हि रॅली छत्रपती शिवाजी चौक, चवदारतळे, गांधारी नाका, साळीवाड नाका, जुनी पेठ, नवेनगर, प्रांत कार्यालय ते छ.शिवाजी चौक अशी काढण्यात आली. सर्व धर्माच्या लोकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी, ''देश हे बलिदान विसरणार नाही. देशाने आता जशास तसे प्रतुत्तर देणे गरजेचे आहे'' असे देखील सांगितले. महाड शहरातील बाजारपेठेत व परिसारात या हल्ल्याचा निषेध म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com