महाड : तरुणीला आत्महत्याला प्रवृत्त करणा-या तरुणावर गुन्हा 

महाड : तरुणीला आत्महत्याला प्रवृत्त करणा-या तरुणावर गुन्हा 

महाड - शहरातील कोटेश्वरी तळे येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या महाडमधील तरुणावर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव शंतनु लक्ष्मण निंबाळकर (रा.महाड) आहे. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शंतनु यांने या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले व तिची फसवणुक करून तिच्या बरोबर शरीरसंबध ठेवले. यातून ही तरुणी सहा महीन्याची गर्भवती झाली असता तिच्या सोबत लग्न करण्यास त्यांने नकार दिला. यामुळे या मुलीनी वाशी ते मानखुर्द रेल्वे स्टेशन दरम्यान, वाशी, नवी मुंबई चालत्या लोकल मधुन 5 ऑक्टोबर 2018 ला गाडीतून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा 11 आक्टोबर 2018 ला मृत्यु झाला. या बाबत मुलीच्या वडिलांनी वाशी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण महाड शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. शंतनु याच्यावर यापूर्वीही बलात्काराचा एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पी.एस.गिरी अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com