महाड - रोटरी क्लबच्या अवयवदान नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुनील पाटकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

महाड - अवयवदान चळवळीची सद्या मोठया प्रमाणात गरज निर्माण झाली असून रोटरी इंटरनँशनल डिस्ट्रिक्ट (3131) अंतर्गत घेण्यात आलेल्या अवयवदान नोंदणी उपक्रमाला पुणे व रायगड जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या जिल्हा नोंदीची गिनीज बुकमध्ये नोंद घेण्यात आली आहे. महाडमधेही अनेक नागरीकांनी यावेळी अवयवदान अर्ज भरून आपले सामाजिक योगदान दिले.

महाड - अवयवदान चळवळीची सद्या मोठया प्रमाणात गरज निर्माण झाली असून रोटरी इंटरनँशनल डिस्ट्रिक्ट (3131) अंतर्गत घेण्यात आलेल्या अवयवदान नोंदणी उपक्रमाला पुणे व रायगड जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या जिल्हा नोंदीची गिनीज बुकमध्ये नोंद घेण्यात आली आहे. महाडमधेही अनेक नागरीकांनी यावेळी अवयवदान अर्ज भरून आपले सामाजिक योगदान दिले.

रक्तदान, नेत्रदानाबरोबरच आता देशात अवयवदान चळवळ सुरू झाली आहे. मानवी अवयव इतर गरजू रूग्णांना मिळाल्याने रूग्णांचे प्राण वाचणार आहेत. गेले कांही वर्षात महाराष्ट्रात हृदय दान केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही संकल्पना आता पुढे आली असून रोटरी क्लब रायगड ने  9 ऑगस्टला अवयवदान नोंदणी करण्याचा विक्रम करण्याचा संकल्प हातात घेऊन उपक्रम पार पाडला. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा निमीत्त बंद असला तरी महाड व जिल्ह्यामध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. हि नोंदणी ऑनलाईन पद्धतीने असल्याने अनेकांनी आपली नोंदणी घरबसल्या केली. याकरीता संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते. सकाळी 11 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत महाडमधील तिन बुथवर ही नोंदणी करण्यात आली. मानवी अवयव दान करण्यामध्ये जे अवयव जिवंतपणी करावयाचे आहेत त्यांची आणि मेंदु मृत झाल्यानंतर, मृत्यु पावल्यानंतर अशा तिन प्रकारात नांदणी करण्यात आली.पुणे व रायगड जिल्हयातून  24 हजार 446 दात्यांनी अवयवदानाची नोंदणी झाली असुन यात महाडमध्ये 750 नोंदणी झाली. रोटरी डिस्ट्रिक्ट( 3131)चे गव्हर्नर डाँ.शैलेश पालेकर,महाडमधील रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी रोटरीचे जिल्हा समन्वयक पराग चांदे, प्रदिप शेठ, यांच्यासह नेहा मेहता, सायली मांडवकर, यांनी विशेष मेहनत घेतली. महाडमधील महाड नगरपालिका, लायन्य क्लब, जनकल्याण पतपेढी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, हिरवळ एज्युकेशन, डॉक्टर असोसीएशन महाड, ज्येष्ठ नागरीक महाड, सिसकेप या संस्थांनी देखील विशेष सहभाग घेऊन या उपक्रमास सहकार्य केले. यावेळी आ.भरत गोगावले, वाहतूक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनीही भेट दिली.

Web Title: Mahad - Exciting response to rotary club organ registration