महाड - गांधारपाले लेण्यांचे संवर्धन गरजेचे

caves
caves

महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत आहे त्याप्रमाणेच या लेण्यांचाही विकास व्हावा अशी मागणी आहे.  

मुंबई - गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेल्या 29 लेण्यांचा समूह आहे.परंतु पर्यटकांना या लेण्यांची पुरेशी माहिती मिळत नाही. महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने या स्थळाला महत्व येणार आहे. पुरातत्व विभागाने काही वर्षापूर्वी येथे पाय-या बांधल्या असल्या तरी ठिकठिकाणी पाय-या तुटल्या आहेत. लेण्यांवर कोणत्याही प्रकारची वीजसुविधा, पिण्यायोग्य पाण्याची सुविधा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जमलेले शेवाळ व उन्हाळ्याल लागणा-या वणव्यामुळे या लेण्या धोक्यात येत आहेत. 

लेण्यात असलेले स्तूप झिजून जात आहेत तर लेण्यांची पायथ्याशी दोन स्तूप बेवारस पडलेले आहेत. या लेण्यांमध्ये पाली भाषेत लिहिलेले शिलालेख असुन शिलालेखांची व स्तूपांची दुरवस्था झाल्याने त्यावरील लिखाण समजत नाही..त्या काळात लेण्यात पाण्यासाठी जलकुंड बांधणण्यात आलेली आहे. कडक उन्हाळ्यातही या जलकुंडात असते ते आता लालसर झालेले आहे. प्लॅस्टीक बाटल्या व कचरा या कुंडात साठला आहे. परंतु, कुंडांची स्वच्छता करणे, गाळ काढणे अशी कामे न केल्याने कुंडात अस्वच्छता आहे. 

ही लेणी कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेली आहेत. पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसर्‍या स्तरात उर्वरित अशी लेणी आहेत. लेणी एकमध्ये भव्य सभागृह आहे. एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पाया जवळ धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे. ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे. 

पाली भाषेतील शिलालेख, खोल्या, सभागृह, दालन, वाळूच्या घडयाळासारखी नक्षी, चैत्यगृह, ओटे, नक्षीकाम. लहान मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, दगडी पाण्याची टाके, प्रतीमा, दिर्घिका, स्तंभ. अर्धस्तंभ ,खांबावरती असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते. 

रायगड संवर्धनाचे काम स्तुत्य आहे. पंरतु, कोकणातील दुर्लक्षीत बौध्दकालिन लेण्यांचे संवर्धन करण्याकडेही सरकराने लक्ष द्यावे नाहीतर हा पुरातन वारसा लोप पावेल. 
- प्रकाश मोरे (अध्यक्ष, कोकण रिपल्बिकन सामाजिक संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com