वडिलांच्या मृत्यूप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

महाड - दारूच्या नशेत आपल्या 85 वर्षीय वडिलांना शारीरिक त्रास देऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्‍यातील किंजळोली गावात मंगळवारी (ता. 16) ही घटना घडली.

याबाबत मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृत व्यक्तीचे नाव कोंडीराम दाभेकर असे आहे. त्यांचा मुलगा संतोष दाभेकर याने आपले वडील अशक्त व आजारी असताना दारूच्या नशेत त्यांना खांद्याला धरून जोराने हलवून घराबाहेर ढकलून दिले. या शारीरिक त्रासाने कोंडीराम दाभेकर मरण पावले, अशी तक्रार त्यांची पत्नी हिराबाई यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.

Web Title: mahad konkan news crime

टॅग्स