मांत्रिकाकडून महिलेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

महाड - मंडणगड तालुक्‍यातील विणे गावातील एका मांत्रिकाने घरातील अडचण काढण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने ढालकाठी येथील एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळची भोर तालुक्‍यातील असलेली ही महिला लग्नानंतर पतीसमवेत ढालकाठी येथे राहत आहे. तिच्या पतीवर कर्ज होते. ते फिटावे म्हणून तिने मांत्रिकाचा आधार घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील विणे या गावातील गोविंद कोंडाळकरकडे ती गेली. मांत्रिकानेही तुमच्या घरात नड असून ती काढावी लागेल, असे तिला सांगितले. त्यानंतर हा मांत्रिक तिच्या घरी आला होता. तांत्रिक विधीत अडथळा नको म्हणून त्याने महिलेला घरात ठेवून तिच्या नवऱ्याला घराबाहेर काढले. त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून घेतला. विधीच्या नावाखाली त्याने या महिलेवर अत्याचार केला.

Web Title: mahad konkan news women rape by exorcist