महाडमधील बंद फ्लॅटमध्ये सांगलीतील एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. 

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. 

नितीन अविनाश कुलकर्णी (वय 50, मूळ रा. सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते, शिवकृपा मोटर्समध्ये सुपरवायझर होते. ते चार सहकाऱ्यांसह फ्लॅटमध्ये राहत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांचा सहकारी जेवण आणण्यासाठी बाहेर गेला होता. तो परतल्यानंतर वारंवार बेल वाजवून व मोबाईलवर संपर्क साधूनही नितीन कुलकर्णी यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कंटाळून तो मित्राच्या घरी गेला होता; मात्र आज सकाळीही कुलकर्णी यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे दरवाजा फोडण्यात आला. त्या वेळी नितीन कुलकर्णी मृतावस्थेत आढळले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: mahad news crime Dead body

टॅग्स