महड, पालीत भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

खोपोली - नव्या वर्षातील पहिल्याच संकष्ट चतुर्थीनिमित्त रविवारी (ता. १५) महड;  तसेच पाली या अष्टविनायक क्षेत्रावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

खोपोली - नव्या वर्षातील पहिल्याच संकष्ट चतुर्थीनिमित्त रविवारी (ता. १५) महड;  तसेच पाली या अष्टविनायक क्षेत्रावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

मकर संक्रात व शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी खोपोली-खालापूरसह लोणावळा-खंडाळा परिसरात गर्दी केली. याशिवाय, महड येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी होती. सकाळपासूनच गणपती संस्थानच्या स्वागत कमानीबाहेर भक्तांची रांग पोहोचली होती. दुपारनंतर ती वळण रस्त्यापर्यंत पोहचली. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून, देवस्थान समिती, स्थानिक नागरिकांनी सोईसुविधा उपलब्ध केल्याचे दिसले. मंदिर व्यवस्थापक राजेंद्र बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारपर्यंतच ५० हजारांच्यावर भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. संध्याकाळी ही संख्या लाखांच्या वर गेली. मंदिर परिसर व महड फाटा येथे पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.

Web Title: Mahad, Pali devotees crowd