महाडमध्ये शिवसेना नेत्याला कंटेनरखाली चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे.

सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स कंपनीत भाडयाने देण्‍यात आला होता. रविवारी रात्री तेथे काम सुरू असताना जेसीबी चालक भारत कदम व कंटेनर चालक शिवपती यांच्‍यात वाद झाला. शिवपतीने भारत याला मारहाण केली म्‍हणून भारत याने कालगुडे यांना बोलावून घेतले. त्‍यावेळी कालगुडे व शिवपती यांच्‍यात बाचाबाची झाली. तेव्‍हा शिवपतीने कंटेनर कालगुडे यांच्‍या अंगावर चालवत त्‍यांना कंटेनरखाली चिरडले त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

या घटनेचे वृत्‍त पसरताच शेकडो नागरिक आणि शिवसैनिक घटनास्‍थळी दाखल झाले. त्‍यामुळे वातावरण तणावपूर्ण बंनले होते. कंटेनर चालक व कंपनीविरोधात गुन्‍हा दाखल करावा. अन्‍यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्‍यात आला. त्‍यानंतर पोलीसांनी खुनाचा गुन्‍हा दाखल केला. या सर्व घडामोडींमागे कंपनी व्‍यवस्‍थापनाचाही हात असल्‍याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. सध्‍या महाड एमआयडीसी परीसरात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

Web Title: In Mahad, the ShivSena leader was crushed under the container