डाॅ. आंबेडकर यांचे मुळ आडनाव माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा

सचिन माळी
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेकडो अनुयायांनी त्यांच्या मूळ गाव आंबडवेला भेट दिली. स्मारकात स्थानापन्न बाबासाहेबांचा पुतळा व ठेवण्यात आलेल्या अस्थिकलशापुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

मंडणगड ( रत्नागिरी ) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेकडो अनुयायांनी त्यांच्या मूळ गाव आंबडवेला भेट दिली. स्मारकात स्थानापन्न बाबासाहेबांचा पुतळा व ठेवण्यात आलेल्या अस्थिकलशापुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. सकाळपासूनच स्थानिक व राज्यभरातून नागरिकांनी गर्दी केली. या दरम्यान विविध वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी सामाजिक, राजकीय, शासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

डाॅ बाबासाहेब यांचे आडनाव सकपाळ

डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ म्हणजे तालुक्यातील आंबडवे हे गाव होय. अतिशय कमी लोकवस्ती असलेले हे बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव. बाबासाहेबांच्या बालपणातील काही काळ येथे गेला आहे. इथे सकपाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहते. या सकपाळ घराण्यातीलच डॉ. आंबेडकर. खरे तर त्यांच्या आडनावाची कहाणी मोठी रंजक आहे. बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ. नंतर त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबडवेकर असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदवले. आजही 7 नोव्हेंबर हा शाळा दिवस ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा शाळा प्रवेश दिन’ म्हणून साजरा होतो. आजही शाळेत बाबासाहेबांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पाहावयास मिळते. महापरिनिर्वाण दिन असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी स्मारकात गर्दी केली. आंबडवेत त्यांच्या जुन्या घरावर स्मारक बांधण्यात आले असून परिसरात अशोकस्तंभ आणि शीलालेख उभारून त्याला स्फूर्तिभूमी असे नाव दिले आहे. पंचतीर्थ म्हणून घोषित झालेल्या आंबडवे गावाचा आदर्श संसद ग्राम योजनेत समावेश करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिक आंबडवेत अभिवादनासाठी येत होते.

आणखी वाचण्यासाठी क्लिक करा

डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण... 

...आम्ही राजे परंपरेचे, तर तुम्ही ज्ञानाचे 

डॉ. बाबासाहेबांच्या मूळ घराचा दगड लखनौमध्ये प्रेरणास्रोत 

डाॅ. आंबेडकर यांना आंबडवेत अभिवादन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahanirvan Day In Dr Ambedkar Native Place Ambdave