'निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, अन्याथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार'

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे.
NCP
NCPesakal
Summary

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे.

मालवण - जिल्ह्यात येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाव्यात असे वरिष्ठांचे आदेश आहेत; मात्र अद्यापपर्यंत पालिका निवडणुकांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सन्मानपूर्वक आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढविण्याचा प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सामंत म्हणाले, येत्या काळात पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या केव्हाही लागू शकतात. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे. कारण कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्हाला महाविकास आघाडीची बंधने मंजूर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चांगली कामे होत आहेत. सर्वांना न्याय देण्याचे काम केले जात असल्याने नवीन लोक पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी आहे. येत्या काळात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तीन पक्षाचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे निश्‍चित केले आहे.

NCP
उकेंची चौकशी बूमरँग? भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी व्हायला हवी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार आहे. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे. कोणाविरुद्ध लढायचे ही केवळ आमचीच जबाबदारी नाही, तर ती मित्रपक्षांचीही आहे. याच पार्श्‍वभूमीवर सतीश आचरेकरांसारख्या तरुणाला नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याचा अंदाज तिन्ही पक्षांनी घ्यायला हवा. त्यानुसार जागा वाटप व्हावे. आमदार वैभव नाईक हे आम्हाला विश्‍वासात घेत आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक चर्चा सुरू आहे; मात्र येत्या काळात स्थानिक पातळीवरून चुकीची माहिती त्यांना दिली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जागा वाटपात योग्य तो निर्णय व्हायला हवा. स्थानिक कार्यकर्त्यांना ते मान्य नसल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज आहे."

ते म्हणाले, शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचे चांगले काम सुरू आहे. जो निधी येतो तो शासनाच्या माध्यमातून येतो. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. त्यामुळे हा निधी येण्याचे श्रेय तीनही पक्षांचे आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने १० हजार क्रियाशील सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार चांगले काम केले असून, १५ ते २० हजार क्रियाशील सदस्य होण्याची वाटचाल सुरू आहे. येथील पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने नूतन शहराध्यक्ष सतीश आचरेकर यांच्याकडे सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पालिकेची निवडणूक लढविली जाईल. त्यानुसार तयारीही करण्यात आली आहे. बर्‍याच यंत्रणांकडून यापूर्वी आचरेकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; मात्र यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आचरेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील."

NCP
मुख्यमंत्री ठाकरेंचं कॉंग्रेस नेत्याकडून तोंंड भरुन कौतुक, म्हणाले..

'ती' वृत्ती हद्दपार करू

आतापर्यंत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर अन्य पक्षात गेले. हे नगरसेवक वैयक्तिक स्वार्थापोटी अन्य पक्षात गेले. निवडून आल्यानंतर अन्य पक्षात जाण्याची जी प्रवृत्ती आहे, ती आम्हाला हद्दपार करायची आहे. आता नव्याने जे पक्षात सामील होत आहेत, ते कोणत्याही अन्य पक्षात जाणार नाहीत. जर गेलेच तर त्यांचे राजकारण पूर्णतः संपविण्याची जबाबदारी मी घेईन, असे जिल्हाध्यक्ष श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

लवकरच मेळाव्यांचे आयोजन

येत्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्ता भरणे जिल्ह्यात येणार आहेत. या भागातील समस्यांवर त्यांचे लक्ष वेधून त्या दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केला जाणार आहे. याचबरोबर येत्या दोन महिन्यात प्रत्येक पंचायत समिती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com